बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: महाराष्‍ट्र नाभिक महामंडळ शाखा बार्शी यांच्‍यावतीने शिवा काशीद यांची 383 वी जयंती साजरी करण्‍यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून समाजभूषण पुरस्‍कार विजेते मुकूंद जानराव यांचा समाजाच्‍यावतीने सत्‍कार करण्‍यात आला. त्‍याचबरोबर उपस्थित पत्रकारांचा समाजाच्‍यावतीने सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या सुरुवातीस चंद्रकांत दळवी यांनी प्रास्‍ताविक केले. संतोष मंडलिक, सुरेश माने, प्रकाश पोकळे, गणेश राऊत, नवनाथ राऊत, गणेश पोकळे, मोहनराव डावरे, श्रीधर डाके, भालचंद्र ठोंबरे, शहाजी थोंबरे, प्रशांत राऊत, आतिश धोत्रे, विष्‍णू ठोंबरे यांच्‍यासह समाजबांधव मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
    यावेळी बोलताना संतोष मंडलिक म्‍हणाले, समाजातील सर्व नागरिकांनी एकत्रपणे सामाजिक उपक्रमात सहभागी होणे गरजेचे असून समाजातील शिक्षणापासून वंचित व्‍यक्‍तींना चांगले शिक्षण, सुविधा, दिशा देण्‍यासाठी सातत्‍याने प्रयत्‍न केले पाहिजे. विशेषतः युवकांनी आपल्‍या समाज भावना लक्षात घेऊन इतरांनाही शिक्षणासाठी प्रवृत्‍त करुन सुशिक्षित समाज घडविण्‍यासाठी प्रयत्‍न केला पाहिजे. आपला समाज अल्‍प संख्‍यांक असला तरी राष्‍ट्रीय योगदान देण्‍यासाठी शिवा काशीद यांचा आदर्श आपल्‍याला व इतरांनाही प्रेरणादायी आहे, असे त्‍यांनी शेवटी सांगितले.
 
Top