नळदुर्ग -: येथील ऐतिहासिक किल्ल्यात मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेल्या जळकोट (ता. तुळजापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा-याचा पाण्यात बुडून मृत्यू दुर्दैवी अंत झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजता घडली.
परवेज मनियार (वय 42 वर्षे, रा. नळदुर्ग, जळकोट ता. तुळजापूर प्रा.आ. केंद्रात लॅब टेक्निशियन) असे पाण्यात बूडून मृत्यू झालेल्याचे नाव आहे. यातील परवेज हा शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आपल्या काही मित्रांसमवेत येथील किल्ल्यात गेला होता. सर्वत्र प्रचंड वातावरण उष्मा जाणवत असल्याने किल्ल्यातील बारादरीजवळ असलेल्या बोरी नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी नदीत उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज आला नाही. परवेज मनियार बाहेर येण्यापूर्वीच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यावेळी ही वार्ता शहरात कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुस-या दिवशी रविवार दि. 14 एप्रिल रोजी नऊ वाजेपर्यंत मृतदेह मिळाला नाही. पोलीस व नागरीक मृतदेहाचा शोध घेत आहेत. परवेज मनियारच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.