बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील महावितरणच्या ग्रामीण व शहरी विभागातून वीज ग्राहकांची गैरसोय सेच मनमानी कारभाराने वीज बिलात तफावत आढळून येत आहे.
एका मीटरचे छायाचित्र दुस-या बिलात तर दुस-या-तिस-या कोणाच्या तरी बिलांत दाखवून अवाजवी बिलांची आकारण करुन दंडेलशाही पध्दतीने वसुली सुरु केली आहे. काही बिलांवर तर घरी बसूनच मीटरचे बिल अंदाजे दाखवून बिलाचे वितरण केलहे आहे. काही बिलांवर तर छाया चित्रातील किती अंक आहेत, हे दिसूनच येत नाही. इतक्या दरिद्री पध्दतीचे मुद्रण जाणीवपूर्वक व हेतू ठेवून खेडसाळपणे केल्याचे प्रकर्षाने जाणवते. सदरच्या बिलाचे छायाचित्र काढणे व बिल तयार करण्याचा ठेका खाजगी तसेच अधिका-यांच्या नेहमीच्या संबंधित व्यक्ती असलेल्या विठ्ठल माजी अप्रंट्रीशप स्वयंरोजगार विविध सेवा सहकारी संस्था म.कारी यांना देण्यात आला आहे. कोणत्या भागात जादा बिलाची आकारण करायची व कोणत्या भागात कमी तसेच कोणाच्या घरी दिवसांतून आठ ते दहा वेळा वसूलदार पाठवून सतत त्रास द्यायाचा याचा ताळेबंद तयार करुन खाजगी जोपासलेली माणसे पाठविली जातात. इंडस्ट्रीजमध्ये तर किती वीजपुरवठा केला आहे आणि किती बिले वसुली केली पाहिजे, याचा अंदाज घेऊन कोणाचा वापर जादा आहे. त्यांच्याकडे जावून सदरच्या व्यक्तीचे बील कसे कमी येईल व त्याचा वापर केलेल्या वीजेची वसुली कोणाच्या बिलावर दाखवायची अथवा कुठेच त्याची नोंद न होऊ देता वरचेवर कसे काय स्वतःचे हित जोपासायचे व वरिष्ठांनी यात लक्ष घालू नये, तसेच त्यांच्या लक्षात आलेच तर त्यांना त्यातील किती हिस्ससा देत समाविष्ट करुन घ्यायचे याचे गणित अगोदरच तयार असते. एका व्यक्तीने तर माहितीचा अधिकार वापरुन डी.पी.डी.सी. तसेच आरा ट्रान्सफार्मर कोणाकोणाला कोणत्या योजनेत बसवून दिले व आजपर्यंत कोणाकडून किती रक्कम अदा करण्यात आली, याचा लेखाजोखा मागविला आहे. परंतु त्या संपूर्ण माहिती दिल्यास अनेक अधिकारी अडचणीत येतील व सदरचा कर्ज त्याने मागे घ्यावा, याकरिता त्या वरूक्तीला काही अधिकारी व कर्मचारी फोन करुन वारंवार विनंत्या करीत आहेत. विभागील कार्यालयात तर याहून कहर पाहायला मिळतो. या ठिकाणी सेवकांची कामे अधिकारी करत असून अधिका-यांच्या खुर्च्यावर सेवक अधिका-यांची जबाबदारी पार पाडत आहे. अधिकारी बाहेर काम असल्याचे कागदोपत्री दाखवून अथवा रजा नसताना संबंधावर रजा भोगून परत येऊन सह्या करुन त्याचेही वेतन खात आहेत.