बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बार्शी तालुक्यात पाणी आणण्याच्या उद्देशाने आ. दिलीप सोपल यांनी अंतिम टप्प्यात सुरु असलेल्या पंपगृह, वितरण नलिका, कॅनॉल आदी कामांची जागेवर जाऊन पाहणी केली. दर पंधरा दिवसाला या पध्दतीने योजनेच्या सर्व कामांची पाहणी करुन आढावा घेण्याचा मानस देखील त्यांनी व्यक्त केला.
बार्शी उपसा सिंचन योजनेचे निधी अभावी रखडलेल्या कामांचा अर्थसंकल्पीय अधिवेशात केलेल्या भाषणानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, पाटबंधारे मंत्री ना. रामराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून या कामासाठी भरघोस 38 कोटीं रुपयांचा निधी मिळविला. उर्वरित 12 कोटींचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात मिळविण्यासाठी आ. सोपल प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर नुकताच उपसा सिंचन योजना आढावा दौरा त्यांनी केला.
त्यांच्या समवेत अधिक्षक अभियंता डी.डी. तोंडे, कार्यकारी अभियंता बी.डी. बिराजदार, नगराध्यक्ष कादर तांबोळी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस नागेश अक्कलकोटे, नगरसेवक मुन्ना शेटे, उपअभियंता तिपरादी, शाखा अभियंता होनखांबे आदीजण उपस्थित होते.
आ. सोपल यांनी सर्वप्रथम रिधोरे (ता. माढा) स्थित सीना नदीवरील पंपगृह टप्पा एक च्या कामांची पाहणी केली. दरम्यान कामाच्या प्रगती व गतीबाबत संबंधितांना आदेश दिले. 10 कि.मी. पैकी 1800 मीटर भागातील पाईपलाईन टाकणेच्या कामाची पाहणी केली. उर्वरीत पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. यानंतर उपळाई ते लक्षाची वाडी या दरम्यानच्या कॅनॉल, पंपगृह टप्पा दोनच्या कामाचीही पाहणी केली. परंडा रोड क्रॉस पुलाचे काम तातडीने सुरु करण्याच्या सूचना केल्या. लक्षाची वाडी ते बार्शी बायपास आगळगाव रोड पर्यंतच्या कॅनॉलची पाहणी करत उर्वरीत आगळगाव रोड ते जामगाव कॅनॉल, जामगाव ते रेल्वे क्रॉसींग पाईपलाईनबाबत सूचना केल्या.
पहिल्या टप्प्यात तावडी तलाव, ढाळे पिंपळगाव तलाव पर्यंत पाणी नेण्यासाठी आ. सोपल प्रयत्नशील आहेत. या कामातील रेल्वे क्रॉसींग अरणगाव रोड ते तावडी तलाव या दरम्यानची निविदा प्रक्रिया तातडीने सुरु करण्याबबातचे आदेश दिले. उर्वरित कामाच्या निविदा प्रक्रिया कार्यारंभ आदेश आदि सोपस्कार पूर्ण झालेले आहेत. त्याप्रमाणे कामकाजास सुरुवात करण्याबाबत आढावा घेण्यात आला.
अधिक्षक अभियंता तोंडे यांनी सिना नदी ते पंपगृह टप्पा एक पर्यंत सिना माढाच्या धर्तीवर कॉंक्रीटीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला. आ. सोपल यांनी माढा पंपगृहाची पाहणी करुन तात्काळ सहमती दिली. या आढावा दरम्यान आ. सोपल यांनी डिसेंबर 2013 पर्यंत बार्शी तालुक्यात पाणी आणण्यासाठी अंतिम टप्प्यातील कामांना पुरेसा निधी दिला आहे. अधिकच्या निधीसाठी स्वतः शासन दरबारी प्रयत्नशील असून त्यादृष्टीने कामाची गती ठेवण्याच्या सूचना केल्या.