बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदयात्री प्रतिष्ठान, नागवंश क्रिडा व सांस्कृतिक मंडळाने गुरुवार दि. 2 मे रोजी 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनक्षर मोहल्ला' या नाटकाचे आयोजन केल्याची माहिती नागेश अक्कलकोटे यांनी दिली.
हा प्रयोग बार्शी येथील पांडे चौक येथे गुरुवार दि. 2 मे रोजी सायंकाळी सहा वाजता सुरु होत आहे. आ. दिलीप सोपल यांच्या हस्ते व नगराध्यक्ष कादर तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली या प्रयोगाचे उदघाटन होईल. संभाजी भगत संकल्पित, राजकुमार नांगडे लिखित नंदु माधव निर्मित दिग्दर्शित या नाटकामध्ये जालना जिल्ह्यातील शेतक-यांनी कलाकार म्हणून काम केले आहे.
औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सुधीरभाऊ सोपल, पोलीस निरीक्षक सालार चाऊस, पोलीस उपअधिक्षक रोहिदास पवार, प्रभारी तहसिलदार शांताराम सांगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शत्रुघ्न बळी, प्रा. मधुकर फरताडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विजेते मुकूंद जानराव, कॉं. तानाजीराव ठोंबरे, प्रा. मधुकर डोईफोडे, जि.औ.बँ. संचालक अरुण कापसे, बाजार समितीचे उपसभापती कुंडलिकराव गायकवाड, उपनगराध्यक्ष राहुल कोंढारे, प्रा. भारती रेवडकर, रमेश पाटील, नंदन जगदाळे, बाळासाहेब गव्हाणे, तानाजी मांगडे, प्रा. दिपक गुंड, युवराज काटे, हर्षवर्धन पाटील, अब्बास शेख, अँड. असिफ तांबोळी, मुर्तुजभाई शेख, मौला मुलाणी, अविनाश गायकवाड आदी पदाधिका-यांच्या उपस्थितीत बार्शीत प्रथमच या नाटयप्रयोगाचे सादरीकरण होत आहे.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त होणा-या इतर अनावश्यक खर्चाऐवजी मंडळाच्यावतीने नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. झी गौरवसह नामांकित पुरस्कार मिळविलेल्या या नाटकाचे महाराष्ट्रात शंभरहून अधिक प्रयोग झाले आहेत. नाट्यगृहाचे आसन क्षमता लक्षात घेत जास्तीत जास्त लोकांना या प्रयोगाचा लाभ घेता यावा, यासाठी पांडे चौक येथे याचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. नाट्यप्रयोग यशस्वीतेसाठी विवेक गजशिव, रुपेश बंगाळे, मंगेश चव्हाण, धिरज भोसले, संजय कचरे, बी.टी. शिंदे, कृष्णा उपळकर, पंकज शिंदे, मकसूद मुल्ला, हर्षद लोहार, उदय कुलकर्णी, बाबा बाळगे आदीजण परिश्रम घेत आहेत.
चर्चेचा विषय
'शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनक्षर मोहल्ला' या नाटकाचे बार्शी शहरातील पोस्टर चर्चेचा विषय ठरले आहेत. 'नाव वाचून दचकू नका, नाटक पहा आणि सोब या', अशा या संयोजकाच्या आवाहनाने चर्चेत अधिक भर टाकली आहे.