नळदुर्ग -: येथील नगरपरिषदेच्‍या बांधकाम समितीच्‍या सभापती सौ. लक्ष्‍मी मारुती खारवे यानी आपल्‍या सभापती पदाचा राजीनामा न.प.चे नगराध्‍यक्ष यांच्‍याकडे दिला आहे.
    सौ. खारवे यांनी दिलेल्‍या लेखी राजीनामा पत्रात म्‍हटले आहे की, बांधकाम समिती सभापती पदाचा पदभार स्विकारल्‍या पासून बांधकामासंबंधी सुचविलेल्‍या कामापैकी एकाही कामाबद्दल न.प.ने गांभिर्याने विचार केला नाही. कट्टे बांधणे, सिडीवर्क करणे, गटारदुरूस्‍ती, अशी छोटी-मोठी कामे सुध्‍दा न.पा.ने केली नाही. बांधकाम समितीतील सदस्‍याचे म्‍हणावे तसे सहकार्य मिळत नाही. केवळ मी मागासवर्गीय महिला असल्‍यानेच असा प्रकार घडत असावा म्‍हणून आपण सदर बांधकाम सभापती पदाचा राजीनामा देत आहे, असे त्‍यांनी राजीनामा पत्रात म्‍हटले आहे.
 
Top