
तुळजापूर तालुक्यातील वागदरी गावात दि. 6 एप्रिल च्या मध्यरात्री अज्ञात चोरटे घुसले व त्यानी व्यसनमुक्तीचे केंद्रस्थान म्हणून ओळखले जाणारे येथील प्रसिध्दी श्री मल्लिकार्जून महादेव मंदिराच्या मंडपात मंदिराचे पुजारी श्रीशैल्य सुरेश महाराज व त्यांची कन्या नात वगेरे भर झोपेत असल्याचे पाहून महाराजांची कन्या यांच्या गळ्यातील एक तोळा सोन्याचे गंठण व उशाला काढून ठेवलेल्या महाराजांच्या शर्टाच्या खिशातील रोख रक्कम तीस हजार रुपये व मोबाईल काढून काढले. तसेच येथील धुळाप्पा वाघमारे यांच बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून आत पिशवित ठेवलेले नवे कपडे व पिशवी त्यांच्या घराच्या अंगणात फेकून दिले तर त्यांचे शेजारी श्रीमती सिमिंता वाघमारे ह्या आपल्या चुलत सासू समवेत त्यांच्या अंगणात झोपलेले असताना त्यांच्या उशाला ठेवलेला, त्यांचा नोकिया कंपनीचा मोबाईल सिमकार्ड सह चोरट्यानी पळविला. तया झोपल्याचे पाहून त्यांच्या डोळ्यावर बॅटरी चोरट्यानी लावली, बहुतेक त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मनी काढून घेण्याचा त्यांचा इरादा असावा, परंतु त्या वेळीच जागी होवून आरडाओरड केल्याने चोरट्यानी येथून पळ काढला. तसेच येथील मजिदच्या बांधकामाशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले कार्यकर्ते यांची पुस्ताकची बॅग बाजूच्या शेतात फकून दिली व एका कार्यकर्त्यांच्या शर्ट अज्ञात चोरट्यानी बेपत्ता केला. या चोरी प्रकरणात सर्वाधिक फटका श्रीशैल्य सुरेश महाराज यानाच बसला आहे. रोख रक्कम, मोबाईल व सोन्याचे गंठण असे एकूण साठ हजाराचा मुद्देमाल चोरट्यानी चोरवून नेला. याप्रकरणी नळदुर्ग पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.