नळदुर्ग -: लालची व निष्क्रीय आधिका-यामुळे लोहगाव (ता. तुळजापूर) येथे गेल्या बारा वर्षापासुन पाझर तलावाचे काम अर्धवट असुन याप्रकरणी प्रशासनाच्या मनमानी कारभाराबददल शेतक-यातुन संताप व्यक्त केला जात आहे. या तलावाचे काम तात्काळ पुर्ण करण्याची मागणी लाभार्थी शेतक-यातुन करण्यात येत आहे.
तुळजापूर तालुक्यातील लोहगावच्या शिवारात गट नं. 268 मध्ये शेतक-यांच्या हितासाठी शासनाच्यावतीने पाझर तलावाचे काम करण्याकरीता अनेक शेतक-यांची जमीन संपादित करण्यात आली. बारा वर्षापूर्वी तलावाच्या कामास कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आले. माती काम करुन त्यापुढे काम झाले नाही व ते आजतागायत अर्धवट अवस्थेमध्ये आहे. या पाझर तलावाचे काम पूर्ण झाल्यास लोहगाव, येडोळा, वागदरी येथील पन्नासपेक्षा अधिक शेतक-यांचे क्षेत्र ओलिताखाली येऊन त्यांना त्याचा फायदा मिळणार आहे. अर्धवट तलावाचे काम पूर्ण करण्याबाबत अनेक वेळा शेतक-यांनी संबंधितांना तोंडी सांगूनही याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष करण्यात येत असल्याचे लाभार्थी शेतकरी धैर्यशिल पाटील, मोहन पाटील यांनी सांगून सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असून मजुराच्या हाताला काम मिळावे, यासाठी प्रशासन विशेष नियोजन करीत आहे. त्या अनुषंगाने लोहगाव शिवारातील अर्धवट तलावाचे काम पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन विशेष उपाययोजना केल्यास मजुरांना रोजगारही मिळेल. त्याचबरोबर अर्धवट असलेले काम पूर्ण होऊन शेतक-यांनाही दिलासा मिळेल, तरी याप्रकरणी संबंधितांची चौकशी करुन दोषी आढळणा-यावर कडक कारवाई करावी व अर्धवट पाझर तलावाचे काम तात्काळ पूर्ण करावी, अन्यथा याप्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.