सोलापूर -: सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात सध्या फोटो मतदार यादी अद्ययावत करणेचे काम चालु आहे. या अंतर्गत ज्यांची नांवे मतदार यादीत आहेत. परंतु फोटो नाहीत अशा मतदारांचे फोटो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी. एल. ओ.) यांचे मार्फत गोळा करताना काही मतदार मतदार यादीत नमुद पत्यावर रहात नसल्याचे आढळून आलेले आहे.
    अशा मतदारांची त्याचप्रमाणे मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांची नांवे http://solapurr.nic.in या वेबसाईटवर पहाणेसाठी उपलब्ध होते. http://solapurr.nic.in या वेबसाईटवर गेल्यानंतर निवडणूक या पर्यायावर जावून आपले विधानसभा नंबर यादी भाग नंबर टाकुन फॉर्म 7 निवडल्यानंतर मतदार यादीतून वगळणी केलेले मतदारांचे नावांची यादी पहाता येईल. आपले नांव वगळणीचे यादी नसल्याची मतदारांनी खात्री करावी.
    या बाबत हरकत असेल तर आपण आपले भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी. एल. ओ.) यांचेशी अथवा संबंधित विधानसभा मतदार संघातील तहसिलदारांशी संपर्क साधावा व आपला फोटो त्यांच्या कार्यालयात जमा करावा. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी. एल. ओ.)  यांचे नावाची यादी व त्यांचे दूरध्वनी नंबर वेबसाईटवर उपलब्ध असून आपण नेहमी ज्या मतदान केंद्रावर मतदान करता त्या मतदान केंद्राचे दरवाज्यावर लिहिलेले आहेत. तरी सर्व मतदारांनी याची नोंद घ्यावी. आपले नाव वगळले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याप्रमाणे आपणास स्वत:हून छायाचित्र जमा करावयाचे असलेस संबंधित तहसिलदार कार्यालयात जमा करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी सोलापूर यांनी केले आहे.
 
Top