शेषनारायण देवडकर
मुंबई :- राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक शेषनारायण ग्यानदेव देवडकर (वय 52 वर्ष)  यांचे दि. 29 जुलै रोजी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे आई-वडिल, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
      बीड जिल्हयातील आडगाव येथील ग्रामीण सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या देवडकर यांनी एम.ई(इलेक्ट्रॉनिक्स) पर्यंतचे शिक्षण घेतले होते.  वारकरी संप्रदायातील घराण्याची कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने त्यांना तत्वज्ञानाची विशेष रुची होती.  पूर्णवादाचे प्रणेते पारनेरकर महाराजांचे ते शिष्य होते. प्रांरभी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये व्याख्याता म्हणून अध्यापनाचे कार्य केल्यानंतर ते शासनाच्या उद्योग विभागात रुजू झाले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.  1998 मध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागात उपसंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. नाशिक व पुणे विभागात सेवा केल्यानंतर ते सध्या मुंबईत कार्यरत होते. या विभागाच्या प्रभारी संचालकपदाची धुराही त्यांनी दोन वर्षे यशस्वीपणे सांभाळली होती. अतिशय बुध्दिमान, कर्तबगार व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा प्रशासकीय वर्तुळात लौकिक होता.  त्यांच्या निधनाने एक उत्तम प्रशासक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.             
 
Top