नळदुर्ग -: दहिटणा (ता. तुळजापूर) येथे शुक्रवार दि. 26 ते सोमवार दि. 29 जुलै रोजी शिवलिंग प्रतिष्ठापना व कळसारोहण समारंभानिमित्त धार्मिक कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन समस्त सदभक्त ग्रामस्थ मंडळी, दहिटणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.
    तुळजापूर तालुक्यातील दहिटणा या गावातील पंचक्रोशित असलेल्या पुरातन महादेव मंदिराचे जिर्णोध्दार करण्यात आले असून या मंदिरात भव्य शिवलिंग प्रतिष्ठापना जंगमवाडीमठ वाराणसीचे श्री श्री श्री जगदगुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शुक्रवार दि. 26 जुलै सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत मोफत बालरोग चिकित्सा शिबीर, महिला आरोग्य तपासणी शिबीरात अनुक्रमे बालरोग तज्ञ डॉ. चिंतामणी चौधरी, डॉ. बालाजी चौधरी, हॅलो मेडिकल फाऊंडेशन अणदूरचे डॉ. शशिकांत अहंकारी, डॉ. सत्यजीत डुकरे हे उपस्थित राहून रुग्णांचे उपचार करणार आहेत. तसेच शनिवार दि. 27 जुलै रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत नॅब जिल्हा शाखा सोलापूरचे नेत्र तपासणी शिबीर, डॉ. हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांचे रक्तदान शिबीर होणार आहे. रविवार दि. 28 जुलै रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत होमहवन व रुद्राभिषेक होईल. सोमवार दि. 29 जुलै रोजी सकाळी साडे नऊ ते दोन वाजता श्री श्री श्री 1008 जगदगुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते शिवलिंग प्रतिष्ठापना व कळसारोहण होणार आहे. यावेळी अचलेर येथील श्री.ष.ब्र. शिवमुर्ती शिवाचार्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचदिवशी गावातून ग्रंथदिंडी व सवादय मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर उपस्थित भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. सर्व वैदिक कार्याचे प्रमुख श्री.वे. शिवयोगी शास्त्री होळीमठ हे राहणार आहेत. सर्व भक्तांनी, सार्वजनिक मंडळानी, भजन मंडळांनी दि. 29 रोजी ग्रंथदिंडीत व जगदगुरुंच्या भव्य मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन जिर्णोध्दार समितीच्यावतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच राजेंद्र माने, बसवराज पाटील, माजी उपसरपंच उमाकांत कदम, विजयकुमार पाटील, राजेंद्र कुंभार, के.डी. पाटील, तुकाराम कदम, आप्पासाहेब पाटील, बलभीम चव्हाण आदींनी पुढाकार घेतले आहे.
 
Top