सोलापूर :-  राज्य शासनाने खरीप हंगाम सन 2013 साठी पिक विमा योजना जाहिर केली आहे. विविध समस्येसमुळे व आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सव शेतक-यांनी पिक विमा भरावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी केले.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय कृषी विमा योजनेच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
    राष्ट्रीय कृषि विमा भरणेबाबत भात, ज्वारी, तूर, उडीद, मूग, सूर्यफुल, भुईमुग, सोयाबिन, तीळ आदि पिकांचा समावेश आहे. यासाठी शेतक-यांनी पिकाची नोंद असलेला 7/12 चा उतारा किंवा पिक असलेबाबतचा कृषी अधिका-यांचा दाखला व अर्ज शेतक-यांनी बँकेत जमा  करावेत. सदरचा अर्ज व भरावयाच्या रक्कमेबाबतची माहिती बँकेत उपलब्ध असणार आहे.
    सदरच्या विमा हप्त्याची रक्कम कमी आहे. सध्या पाऊस चांगला असला तरी भविष्यातील संभाव्य अडचणीचा विचार करुन विमा भरावा. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2013 आहे. अखेरच्या दिवशी बँकेत गर्दी होवू शकते. त्यामुळे शेतक-यांनी त्यापूर्वीच तात्काळ पिक विमा हप्ता  भरण्याचे आवाहन करण्यात आले.
    रब्बी हंगाम 2011 मध्ये सोलापूर जिल्ह्यात 56 हजार 855 शेतक-यांनी विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी 50 हजार 447 शेतक-यांना या योजनेत विविध पिकाखाली लाभ मिळाला. रब्बी हंगाम 1999 पासुन शासनाने ही योजना सुरु केली आहे. या योजनेत खरीप 2012 पर्यंत 7 लाख 70 हजार 549 शेतक-यांनी सहभाग घेतला. त्यातील 4 लाख 53 हजार 830 शेतक-यांना या योजनचा लाभ मिळाला असल्याची माहितीही कृषी विभागाच्या अधिका-यांनी बैठकीत दिली.
 
Top