बार्शी –: अध्यापिका विदयालय येथील सांस्कृतीक विभागाच्यावतीने कवि रामचंद्र इकारे यांच्या काव्योत्सव कवितांचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ. ए.एस. चौगुले, बी.एम. देडे, जे.एस. माळी, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस नरेंद्र दाभोळकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
      इकारे यावेळी बोलताना म्हणाले, जीवनाच्या प्रत्येक क्षणांचे प्रतिबिंब कवितेतून उमटते, त्यामुळेच कविता ही मानवी जीवनाचा आरसा बनते. कविता म्हणजे काय हे सांगणा-या “हाक” या कवितेपासून काव्योत्सव सुरु झाला. नंतर मनातील भावनांचे कप्पे उलगडत गेले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, संस्कारक्षम जीवन अशा विविध विषयांना स्पर्श करणा-या कवितांच्या माध्यमातून हास्याबरोबर चिंतनाचाही समावेश काव्योत्सवातून झाला. सर्वसामान्य माणूस जगण्यापेक्षा आपल्या अंगी असलेल्या गुणांचा विकास करत असामान्य व्यक्ती बनावे. जीवनातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही, मनात असलेल्या इच्छाशक्तीला कृतीशीलतेची जोड देऊन जीव सुखकर करावे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.एम. हामणे यांनी केले तर आभार जे.के. लोखंडे यांनी मानले.
 
Top