बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: जीवनात परमानंद सुखुखानंद व आंतरिक खुशी प्राप्त करण्यासाठी स्वत:ला देह न समजता आत्मा समजले पाहिजे. मनाला र्इश्वराकडे वळविणे गरजेचे आहे. कारण यामुळेच आपणास आत्म्याचे जे मुळ गुण अथवा स्वभाव पवित्रता शांती‚ प्रेम‚ सुख‚ आनंद‚ ज्ञान व शक्ति यांचा अनुभव येवू शकेल, असे उदगार भरतपूर येथील कविताबहनजी यांनी येथील ब्रहमाकुमारी सेवाकेंद्रावर काढले. त्या बार्शी येथील विद्यालयाच्या धार्मिक प्रभागाद्वारे आयोजित एक र्इश्वर एक विश्व परिवार यात्रा अभियानाच्या अंतर्गत आयोजित सदभावक स्नेहमिलन कार्यक्रमात आपले मुख्य वक्तव्य देत होत्या.
    र्इश्वराच्या आठवणीद्वारे कार्यक्रमाची सुरूवात झाल्यानंतर ब्र. कु. शकुंतला‚ महादेवी व राणी या भगिनीनी सर्वांचे स्वागत तिलक व पुष्पगुच्छाद्वारे केले.  डॉ नाना सामानगावकर‚ प्रतापराव जगदाळे‚ नानासाहेब कदम‚ मालाड येथील कुंतीबहनजी‚ भरतपूर येथील कविता बहनजी‚ नारायणभार्इ‚ बबनबार्इजी‚ शशीबहनजी‚ सोमप्रभबहनजी‚ संगीताबहनजी व वैजिनाथभार्इ या
मान्यवरांनी दीपप्रज्वलनाद्वारे स्नेहमिलनाचे उदघाटन केले.
    अभियान संचालक नारायणभार्इ यांनी अभियानाचा उददेश स्पष्ट केला. नानासाहेब कदम‚ प्रतापराव जगदाळे, कुंतीबहनजी यांनीदेखील समयोचित मनोगत व्यक्त केले. सोमप्रभाबहनजी व संगीताबहनजी यांनी अतिथींना र्इश्वरीय भेटवस्तू देवून सम्मानित केले. सभेमध्ये बार्शी शहरातीलातील आध्यात्मिक‚ धार्मिक‚ सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वांचा पुष्प देवून सत्कार करण्यात आला.
    आभारप्रदर्शन करणारे मोहनभार्इ यांनी कथन केलेले जीवनातील सदभावनाविषयक प्रत्यक्ष अनुभव कौतुकाचा विषय ठरला. ब्र. कु. वैजिनाथभार्इ यांनी सुत्रसंचलन केले. कार्यक्रमापूर्वी शिवाजी कॉलेजपासून ब्रम्हकुमारी सेवाकेंद्रापर्यंत विविध मार्गाने आयोजित शोभायात्रेचे उदघाटन दौलशेठ चांडक यांच्या शुभहस्ते संपंपन्न झाले. अत्यंत सुंदर व नियोजनबध्द कार्यक्रमाच्या सफलेसाठी संगीताबहनजी‚ अनिताबहन करवा‚ नानासाहेब कदम यांच्यासह सवब्र हमाकुमार बंधू भगिनी यांनी मोलाचे योगदान केले.
 
Top