नळदुर्ग -: गणेशोत्‍सवानिमित्‍त व्‍यासनगर नळदुर्ग येथील जयहिंद तरुण गणेश मंडळाच्‍यावतीने रांगोळी स्‍पर्धा, निबंध स्‍पर्धा, नृत्‍य स्‍पर्धा यासह विविध स्‍पर्धा घेण्‍यात आले.
      नृत्‍य स्‍पर्धेचे उदघाटन राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते आदित्‍य बोरगांवकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्‍हणून शहर युवक कॉंग्रेस अध्‍यक्ष बसवराज धरणे, राष्‍ट्रवादीचे जिल्‍हा युवक कार्याध्‍यक्ष अमित पाटील. हे उपस्थित होते. नृत्‍य स्‍पर्धा सुरु असताना न.प. गटनेते नय्यरपाशा जहागिरदार, राष्‍ट्रवादी शहर कार्याध्‍यक्ष महेबुब शेख यांनी भेट दिली. या नृत्‍य स्‍पर्धेमध्‍ये तीस स्‍पर्धकांनी भाग घेतले होते. भावगीत, कोळीगीत व धार्मिक गिताच्‍या तालावर बालचमूचे आकर्षक नृत्‍य झाले.
     वरील विविध कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी मंडळाचे अध्‍यक्ष नवल जाधव, उपाध्‍यक्ष विनोद जाधव, नागनाथ सर्जे, सचिव प्रसन्‍न कदम, कोषाध्‍यक्ष सचिन गायकवाड, सहसचिव अभिजीत लाटे, सल्‍लागार अमित कुलकर्णी, सुरेश गायकवाड, मिरवणुक प्रमुख अमर भाळे, पंकज काळे, आनंद जाधव, अमोल व-हाडे, बबलु काळे, मुकुंद नरवडे, संदीप गायकवाड, विनिल जांभळे, सदस्‍य बंटी गायकवाड, भैरवनाथ सर्जे, आनंद लाटे, राजेंद्र घोडके, नितीन चौधरी, प्रवीण चव्‍हाण, मयुर बेले, सुरज गायकवाड, रवी दळवी, सुरेश सुरवसे, मनोज बेले, भालचंद्र घोडके, श्रीकांत सुरवसे आदींनी परिश्रम घेतले.

 
Top