बार्शी : येथील राऊत चाळ परिसरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये सार्वजनिक ३० शौचालयांच्या कामाचा शुभारंभ माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक विजय राऊत, अमोल चव्हाण, रेखा नाळे, सिताबाई पवार, आण्णा शिंदे, अभियंता शेळके आदी उपस्थित होते.
सदरच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात विस्थापित गिरणी कामगारांची कुटूंबे वास्तव्य करीत असून त्यांना देण्यात आलेल्या घरकुलाची जागा अत्यंत तोकडी आहे. सदरच्या जागी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शौचालयाच्या प्रश्‍नासाठी नगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करुनही केवळ विरोधकांचा प्रभाग म्हणून कोणत्याही प्रकाराची मदत नगरपरिषदेकडून झाली नाही. आपण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमदवार उभे करतांना सर्वसामान्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे त्यामुळेच स्वखर्चातून हे काम सुरु केले आहे. येत्या दिड महिन्यात सदरचे काम पूर्ण करण्यात येत असून चांगली सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. सत्ताधार्‍यांनी शहरातील मुतार्‍यांची संख्या कमी केली, महिलांची तर कोणतीही सोय नसून बार्शी शहरातील पाणीपुरवठ्याच्या व स्वच्छतेच्या अनेक समस्या असतांना पाणीपुरवठा व स्वच्छता मत्री यांच्याबाबत तीव्र नाराजी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
 
Top