उस्मानाबाद :- अनाथ, निराधार, निराश्रित बालके, अत्याचार पिडीत महिला यांच्यासाठी कार्य करणा-या महिला, स्वयंसहायता गट, कृषी आणि ग्रामीण रोजगार, पर्यावरण संरक्षण, महिला सशक्तीकरण, महिलांचे आरोग्य, कला व सांस्कृतिक कार्य, चेतना विकास आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांना केंद्र शासनाच्या वतीने स्त्री शक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तीन लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
    देवी अहिल्याबाई होळकर, कण्णगी, माता जिजाऊ, राणी गैंदील्यु जेलीयांग, राणी लक्ष्मीबाई आणि राणी रुद्रम्मा देवी यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कारासाठी संबंधित क्षेत्रातील मागील ५ वर्षांचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल.
    इच्छुक पात्रताधारक महिलांनी त्यांचे अलिकडील पासपोर्ट साईज फोटो, आवश्यक कागदपत्रे यासह चार प्रतीत प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयाकडे दिनांक 10 नोव्हेंबरपर्यत सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वैभव सूर्यवंशी यांनी केले आहे. संबंधितांनी त्यांचे प्रस्ताव  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, गाळा क्रमांक 15, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद येथे पाठवावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top