उस्मानाबाद : ग्रामीण भागातील 18 वर्षावरील युवती व महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचा नमुना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण), जि. प. उस्मानाबाद, बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी सदर अर्ज प्राप्त करुन ते संबंधित तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयात दिनांक ३० आक्टोबरपर्यंत भरुन द्यावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. उस्मानाबाद आणि सभापती, महिला व बालकल्याण समिती, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top