![]() |
प्रमोद महाजन |
उस्मानाबाद : तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (येवती) संचलित व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने दिवंगत खासदार प्रमोदजी महाजनल आंतर महाविद्यालयीन भव्य राष्ट्रीय वादविवाद स्पर्धेस मंगळवार दि. 29 ऑक्टोबर रोजीपासून प्रांरभ होत आहे. या स्पर्धेचे उदघाटन मंगळवारी सकाळी नऊ वाजता होणार आहे. समारोप कार्यक्रमासाठी बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांची उपस्थिती राहणार आहे.
मंगळवारी सकाळी रेखाताई महाजन, यमगरवाडी सेवालयाचे प्रमुख डॉ. अभय शहापूरकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. बुधवारी दुपारी 1 वाजता लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात पारितोषिक वितरण करण्यात येणार असून, या कार्यक्रमासाठी खासदार पियुष गोयल, मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अँड. आशिष शेलार, भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा पंकजा पालवे-मुंडे, ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी, सुनील चावके, रेखाताई महाजन, संस्थेच्या अध्यक्षा पूनम महाजन-राव यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव अँड. मिलिंद पाटील, प्राचार्या डॉ.अनार साळुंके यांनी केले आहे.