सोलापूर -: महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री या राष्ट्रपुरुषांसारखी दृढ निश्चयाची शक्ती बाळगली तर कोणतेही व्यसन सहज सुटू शकते. असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री दिलीप सोपल यांनी केले.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव सभागृहात समाजकल्याण विभागाकडून आयोजित व्यसनमुक्ती सप्ताहाचे उदघाटन आणि आंतरजातीय विवाहीत दांपत्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि. प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, आमदार बबन शिंदे, उपाध्यक्ष सुभाष गुळवे, समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे, कृषी सभापती जालींदर लांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव आणि कॅफो श्री. जगदाळे उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सोपल मार्गदर्शन भाषणात म्हणाले की, महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री या राष्ट्रपुरुषांनी संपुर्ण आयुष्य समाजासाठी झिजवून परक्रमाचं शिल्प उभारलं. त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा यासाठीच समाजकल्याण विभागामार्फत दरवर्षी व्यसनमुक्ती सप्ताहाचे आयोजन केले जाते. या राष्ट्रपुरुषांचे विचार समाजामध्ये रुजण्यासाठी सगळयांनीच प्रयत्न केले पाहिजेत. या राष्ट्रपुरुषांसारखी दृढ निश्चयाची शक्ती अंगी बाळगली तर कोणतेही व्यसन सहज सुटू शकते. असा उल्लेख त्यांनी केला.
आज शिक्षणाने जातीयतेची रुढ बंधने शिथील केली आहेत. ख-या अर्थान शिक्षणानेच जातीयवाद नष्ट होऊ शकतो. तरुण पिढीने शिक्षणाने दिलेले विचार प्रत्यक्षात आणल्यामुळे आंतरजातीय विवाह मोठया प्रमाणावर होत आहेत. शिक्षणामुळेच विचारात फरक पडून जातीयवाद गळून पडेल आणि एकसंध भारत निर्माण होण्यास मदत होईल. असेही ते म्हणाले.
डॉ. माळी यावेळी म्हणाल्या की, या दोन्ही महामानवांनी केलेले कार्य स्मरणात राहण्यासाठी हा व्यसनमुक्ती सप्ताह पाळण्यात येतो. यांचेच विचार तरुण पिढीने आत्मसात केले पाहिजे. तसेच समाज परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने आंतरजातीय विवाह करुन आदर्श निर्माण करण्याची गरज आहे. समाज परिवर्तनासाठी शासन वेगवेगळया योजना राबवित असते. त्याचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. प्रत्येक आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्यासह सर्वांनीच घरात शौचालय बांधली पाहिजेत. असेही त्या म्हणाल्या.
आ. शिंदे म्हणाले की, व्यसनमुक्तीसाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत असून सामाजिक संघटनांनी देखील मोठया प्रमाणावर प्रयत्न केल्यास समाज निश्चीतच व्यसनमुक्त होऊ शकतो.
याप्रसंगी व्यसनमुक्तीवरील पोस्टरचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांबळे यांनी केले तर आभार घाटे यांनी मानले.