उस्मानाबाद :- प्रायोगिक तत्वावरील हवामानावर आधारीत पथदर्शक फळपिक विमा योजनेतंर्गत जिल्ह्यासाठी केळी फळपिकाचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेतंर्गत सन 2013- 14 या हंगामात केळी पिकासाठी विमा प्रस्ताव बँकेत भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर ही आहे. केळी पिकासाठी रक्कम 6 हजार रुपये प्रति हेक्टरी या प्रमाणे बँकेत भरुन पिक संरक्षित करावे.
कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी या योजनेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी किंवा संबंधित तालुका कृषि अधिकारी/ मंडळ कृषि अधिकारी/ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक/ राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधावा.