कळंब : शहरातील सर्व्हे नं. १०८ मधील सावरकर चौक ते सराफ लाईन, महादेव मंदिरापर्यंत छोटे मोठे व्यापारी गेल्या तीस ते पस्तीस वर्ष्यापासून दुकाने टाकून व्यवसाय करत आहेत, मात्र नगर परिषद कळंब यांनी जागाखाली करण्यासाठी अचानक नोटीस दिली आहे, मागील तीन वर्षापासून कळंब तालुका व शहर परिसरात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला आहे अशी दुष्काळी परिस्थिती असताना पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न समोर असताना नगर परिषदेने सर्वे न १०८ मध्ये व्यापारी संकुल बांधण्यासाठी व्यापार्यांना जागा रिकाम्या करण्यासाठी नोटीस दिल्या आहेत, सदर ठिकाणाहून व्यापार्यांची दुकाने काढण्यापूर्वी इतर ठिकाणी त्यांचे पुरार्वसन करावे अशी मागणी तहसीलदार कळंब यांच्याकडे निवेदनाद्वारे आम आदमी पार्टीचे कळंब तालुका संयोजक दत्तात्रय तनपुरे यांनी केली आहे.
दरम्यान व्यापारी प्रभाकर बारटक्के यांनी कळंब न.प. च्या कार्यवाहीस स्थगिती द्यावी, यासाठी अँड.प्रताप सोनटक्के यांच्यामार्फत कळंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. याची दखल घेवून न्यायालयाने बारटक्के यांच्या दुकानगाळ्याबाबत २१ नोव्हेंबरपर्यंत न.प.ने कोणतीही कार्यवाही करु नये, असे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे.