वॉशिंग्टन : सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या 'फेसबुक' वरील लाईक हे बटण या संकेतस्थळाचा आत्मा आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. एखाद्या युझरने फेसबुकवर टाकलेली पोस्ट, अपलोड केलेले फोटो व व्हिडिओ लाईक किंवा अनलाईक करणे आणि ते इतरांसोबत शेअर करणे हे 'लाईक' व 'शेअर'च्या माध्यमातून केले जाते; परंतु ही दोन बटणे नव्या रूपात आणण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. लाईक या बटणावरील अंगठय़ाचे चिन्ह बदलून फेसबुकने निळय़ा रंगात एफ लाईक आणि एफ शेअर असे डिझाईन आणले आहे. हे दोन्ही पर्याय एकाचवेळी वापरता येणार आहेत. येत्या काही दिवसांत प्रत्येक फेसबुक युझर्सच्या अकाऊंटवर हे नवे चिन्हे आपोआप अपग्रेड झालेले असणार आहे.