बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित केलेली राज्यभरातील १९ केंद्रांवर ५३ वी मराठी नाट्य सर्धा सुरु आहे. सदरच्या स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या तुळजापूर व उस्मानाबाद येथील संघाने प्रयोगाच्या वेळी दांडी मारल्याने स्पर्धेतील नाट्य प्रयोग रद्द झाले आहेत. सदरच्या रद्द झालेल्या प्रयोगामुळे नाट्य रसिक हिरमुस होऊन परतले आहेत.
शनिवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी होणारे अभय राठोड लिखित 'एक नार गाव बेजार' हे नाटक वसंतराव नाईक विद्या विकास शिक्षण संस्था गंधोरा, तुळजापूर यांनी प्रवेशिका घेतली होती. या संघाचा नाट्य प्रयोग सुरु होण्याअगोदर स्पर्धा समन्वयकांनी संपर्क साधल्यावर त्यांनी दिलेले संपर्क क्रमांक चुकीचे असल्याचे तसेच वेळ होऊनही संघ गैरहजर झाल्याने स्पर्धेतील प्रयोग होऊ शकले नाहीत. सदरच्या प्रयोगामुळे समन्वयकांनी उर्वरित सर्व टिमच्या संबंधितांना फोन करुन खात्री करण्यास सुरुवात केली.
यावेळी याचप्रकारे रविवार दि. 24 नोव्हेंबर रोजी होणारे रामचंद्र गुरव लिखित 'छक्के पंजे' हे नाटक सादरीकरण करणारे नटराज शिक्षण प्रसारक मंडळ शाहुनगर, उस्मानाबाद या संघाचाही संपर्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळले. हा देखिल प्रयोग संघाच्या अनुपस्थितीमुळे रद्द झाला. सोमवारी होणार्या ए.जी.राठोड लिखित नवीन दिशा याची प्रवेशिका भरणारे निपॉन सोशल वेल्डफेअर सोसा,तुळजापूर आणि दि. २८ रोजी होणारे उध्वस्त हे नाटक धर्मवीर संभाजी राजेभोसले सामाजिक संस्था संचलित शिवाजी लोकनाट्य मंडळ, उस्मानाबाद यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याने सदरच्या दोन्ही संघाच्या वतीने भरविण्यात आलेल्या प्रवेशिका रद्द होण्याची शक्यता स्पर्धा समन्वयकांनी व्यक्त केली.
सदरच्या संघाची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वरिष्ठांना कळविण्यात आली असून या संघांना यापुढे काळ्या यादीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल असेही सह सहसन्वयक प्रताप दराडे यांनी सांगीतले.