उस्मानाबाद –: लोकमंगल फाऊंडेशनचा सर्वधमीय सामुहिक विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी आपलेच कार्य आहे, असे समजून जबाबदारी घ्यावी. समाजातील गरिबी दूर करण्याचे कार्य लोकमंगलने हाती घेतले आहे. त्यासाठी तुम्हीही पूढे या, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू, असे आवाहन लोकमंगल समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार सुभाष देशमुख यांनी केले.
    लोकमंगलच्या वतीने दि. 28 नोहेंबर रोजी येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या क्रीडा मैदानावर सर्वधमीय सामूहिक विविह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळयात नियोसंदर्भात सर्व पक्ष संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक उस्‍मानाबाद शहरातील बार्शी नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात पार पाडली. यावेळी मार्गदर्शन करताना हे सांगत होते. बैठकीस रोहन देशमूख, रामराजे पाटील, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, अनिल महागावकर, शहाजी पवार, सोलापूर महापालिकेचे सदस्य नरेंद्र काळे, डॉ. गोविंद कोकाटे, भालचंद्र खरसडे प्रमुख उपस्थिती होती.
   पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, आपण राजकारण नसून समाजकारणी आहोत. सामान्यांचे अश्रू पुसण्‍याचे काम आतापर्यंत केले. यापुढे करीत राहणार आहे. हे करीत असताना आपल्याही मर्यादा आहेत. याचे उल्लंघन कदापी होवू देणार नाही, असे सांगून तुम्हीही कोणाच्या दबावाला बळी न पडता स्वतः लढायला शिका, अशी साद त्यांनी दिली. राजकारणात आपण अनावधानाने आलो. भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आणि विजयी झालो. यापुढे पक्षाने तिकीट दिले नाही म्हणून कधी रागावणार नाही. उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लढावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतू ही जागा शिवसेनेच्या वाटयाला आहे. परंतू आपले स्वप्न नरेंद्र मोदी यांना दिल्लीत पाठविण्याचे आहे हे लक्षत ठेवून सर्वांनी महायूतीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. हे राष्‍ट्र वैभवशाली करण्यासाठी आपण एकजूटीची गरज आहे. उस्मानाबाद जिल्हा सर्वसंपन्न व्हावा, अशी आपली प्रामाणिक भावना असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यकर्त्यांनी मांडलेल्या सुचनांचे स्वागत करुन त्या अंमलात आणल्‍या जातील. मुलीच्या लग्नासाठी शेतक-यांना कर्ज काढण्याची वेळ येवू नये म्हणून हा विवाह सोहळा आयोजित केला आहे. त्यात आपल्या मुला-मुलींचे विवाह करुन नाहक कर्जबाजारी होवू नका, असेही त्यांनी सांगितले.
       लोकमंगलचे कार्याध्यक्ष रोहन देशमुख म्हणाले की, जिल्‍ह्यातील दूध, ऊस आज बाहेर जात आहे. परिणामी येथील उद्योगाला चालना मिळत नाही. हे कुठेतरी थांबायला हवे. त्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे, ही जबाबदारी येथील संस्था संघटनांनी घ्यायला हवी. यंदाच्या सामूहिक विवाह सोहळयात ज्यांना मदत करायची आहे. यांनी पूढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
          यावेळी ज्ञानेश्वर सुर्यवंशी, नरेंद्र काळे, अविनाश महागावकर, शहाजी पवार, सतीश आरगडे, भालचंद्र खरखडे, अर्जून कदम, जीवण देशमूख, बाबुराव पूजारी, नगरसेवक सोमनाथ गुरव यांनाही मार्गदर्शन केले. विवाह सोहळयात विवाहबध्द झालेल्या जावयांनी आपले अनुभव कथन केले. सुत्रसंचालन संतोश नाईक यांनी केले. बैठकीस पंडीत लोमटे, सतीश देशमुख, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामजीवन बोंदर आदीसह विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.    
 
Top