उस्मानाबाद :- एकात्मिक पाणलोट कार्यक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणलोट जनजागृती अभियानाचे उदघाटन उस्मानाबाद तालुक्यातील भडाचीवाडी येथे  आमदार ओममराजे निंबाळकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. सदरील अभियान 6 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात  राबविण्यात येणार आहे. 
    यावेळी अध्यक्ष पणलोट समिती भडाचीवाडी उमेश बिराजदार,  विभागीय कृषि अधिकारी जी. व्ही. सस्ते, मंडळ कृषि अधिकारी डी. बी. काकडे, प्रकल्प  कार्यान्वयक यंत्रणा  ए. पी. चिक्षे, मंडळ कृषि अधिकारी  बी. व्ही. पाटील, कृषी पर्यवेक्ष के. ए. मगर, ए. ए. घोगरे, व्ही. एस. सुर्यवंशी, वाय. एन. इंगळे, डी. पी. जगताप आदि कृषी सहायक व पाणलोट विकास पथकातील सदस्य प्रमुख उपस्थिती होती.
    प्रारंभी आ. निंबाळकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, तालुक्यातील पाण्याची उपलब्धता व वारंवार येणारी दुष्काळसदृष्य परिस्थिती विचारात घेवून कृषी विभागाने जलसंवर्धनाच्या कार्यक्रमास महत्व देण्याची गरज प्रतिपादन केली.
    श्री .बिराजदार, यांनी एकात्मिक पाण्लोट विकास कार्यकमाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक चिक्षे यांनी केले तर आभार प्रदर्शन सस्ते यांनी केले. यावेळी बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.                 
 
Top