कोलकाता -: वेस्‍ट इंडिजविरुद्ध कोलकाता येथे सुरु असलेल्‍या पहिल्‍या कसोटीत भारताने एक डाव आणि 51 धावांनी विजय मिळविला. मोहम्‍मद शमीने घातक रिव्‍हर्स स्विंग गोलंदाजी केली. पहिल्या डावाप्रमाणे दुस-या डावातही मोहोम्मद शामीच्या गोलंदाजीसमोर विडिंजच्या फलंदाजांनी गुडघे टेकले आहेत. मोहोम्मद शामीने चार गडी बाद केले आहेत. दुस-या डावात विडिंजच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकाची वेस ओलांडता आलेली नाही. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
    मोहम्‍मद शमीने मार्लन सॅम्‍युअल्‍स, दिनेश रामदीन, डॅरेन सॅमी, शेन शिलिंगफोर्ड आणि कॉट्रेल यांचे बळी घेतले. अप्रतिम रिव्‍हर्स स्विंग गोलंदाजीचे प्रदर्शन करताना त्‍याने विंडीजची मधली आणि तळाची फळी उद्ध्‍वस्‍त केली.  त्‍याला दुस-या बाजुने आर. अश्विनने चांगली साथ दिली. अश्विनने 3 फलंदाज बाद केले. तर भूवनेश्‍वर कुमारने धोकादायक ख्रिस गेलचा एकमेव बळी घेतला. भारताने पहिल्‍य डावात 219 धावांची आघाडी घेतली. भारताने सर्व बाद 453 धावा केल्या. त्याला उत्तर देताना वेस्ट इंडिजचा आघाडीचा फलंदाज क्रिस गेल अवघ्या 33 धावांवर बाद झाला. वेस्ट इंडिजचा निम्‍मा संघ अवघ्‍या 126 धावांमध्‍येच परतला होता. शमीने कॉट्रेलचा त्रिफळा उडवून भारताच्‍या विजयावर शिक्‍कामोर्तब केले. शिवनारायण चंदरपॉल दुस-या बाजुने 31 धावांवर नाबाद राहिला.
    तिस-या दिवशी रोहित शर्मापाठोपाठ रविचंद्रन अश्विननेही शतक ठोकले. अश्विनने आठव्‍या क्रमांकावर फलंदाजीस उतरुन रोहित शर्मासोबत द्विशतकी भागीदारी रचली. भारताचा डाव अडचणीत आलेला असताना त्‍याने रोहितला अतिशय मोलाची साथ दिली. रोहित शर्माने गुरुवारी पदार्पणातच शतक ठोकले. काल अश्विन 92 धावांवर नाबाद होता. आज त्‍याने शतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्‍ये अश्विनचे हे दुसरे शतक आहे. त्‍याने वेस्‍ट इंडिजविरुद्धच मुंबई येथे पहिले शतक ठोकले होते. भारताचा पहिला डाव ४३५ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताकडे २१९ धावांची भक्कम आघाडी होती. रोहित शर्मा आणि आर. अश्विनच्या 280 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताला इथवर मजल मारता आली. दुस-या डावात फलंदाजीला आलेले विंडीजचे फलंदाज भारताच्या गोलंदाजीसमोर फेल ठरले आणि भारताने एक डाव आणि ५० धावांनी विजय मिळवला.
 
Top