उस्मानाबाद -: निर्मल भारत अभियान व राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात लोकसहभाग वाढविण्यासाठी व जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन युवकांना या विषयामध्ये सहभागी करुन घेण्यासाठी दि. २८ नोव्हेबर ते १२ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तालुकास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही गटातून प्रथम व व्दितीय क्रमांक प्राप्त युवकांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व करंडक स्पर्धेचे आयोजन दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी पुढील विषय-स्वच्छ निर्मल शाळा-बालकास लावी लळा, शुध्द थेंब पाण्याचा-लाभ आरोग्यदायी जीवनाचा, कचरा नव्हे कांचन-घनकचऱ्याचे व्यवस्थापन, मिळुन साऱ्याजणी मिळवु शुध्द पाणी, साठवू थेंब थेंब पाण्याचा, विचार रुजवू पाऊस संकलनाचा.
वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी- तरुणाईचे नवे धडे स्वच्छतेकडून समृध्दीकडे, करु सांडपाण्याचे व्यवस्थापन, धरतीचे होईल नंदनवन, करु तपासणी पाण्याची-हमी आरोग्यदायी जीवनाची, माझ्या स्वप्नातील स्वच्छ, सुंदर, निर्मल व समृध्द महाराष्ट्र, बहु असोत सुंदर, स्वच्छ महादेश हा, असे विषय आहेत.
दोन्ही गटातील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना, प्रथम क्रमांकासाठी रु. ११ हजार, व्दितीय क्रमांकासाठी रु. ७ हजार व तृतीय क्रमांकासाठी रु. ५ हजार, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेसाठी जिल्ह्यातील पाणी व स्वच्छता विषयामध्ये आवड असणा-यांनी महाविद्यालयीन युवकांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास व जिल्हा समन्वयक तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शितलकुमार मुकणे यांनी केले आहे.