अकलूज -: आपल्या दवाखान्यात प्रसूती झालेल्या महिलेला मुलगी झाली तर यापुढे कायमस्वरूपी प्रसूतीचे शुल्क न घेण्याचा अभिनव उपक्रम अकलूज येथील फडे नर्सिंग होमने सुरू केल्याचे डॉ. सुभाष फडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
फडे नर्सिंग होम, दोशी पॅथ लॅब आणि अकलूज रोटरी क्लब यांचे संयुक्त विद्यमाने 9 डिसेंबर रोजी फडे नर्सिंग होम येथे मोफत स्त्री रोग तपासणी व प्रसूतीपूर्व तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सुभाष फडे यांनी ही माहिती सांगितली. ते म्हणाले, गर्भधारणा झाल्यापासून फडे नर्सिंग होममध्ये प्रसूती होईपर्यंत नियमित तपासणीसाठी येणार्या महिलांना सवलतीच्या दरात सर्व तपासण्या केल्या जातील. ज्या महिलांना मुलगी होईल त्यांना प्रसूतीसाठी लागणारे शुल्क माफ करण्यात येईल.
शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्त्री विकाराच्या तपासण्या मोफत करण्यात येतील. त्यावर उपचार करण्यात येतील. दि. 6 डिसेंबरपर्यंत महिलांनी या शिबिरासाठी नावे नोंदवावीत, असे आवाहन डॉ. सुभाष फडे यांनी केले आहे. या वेळी डॉ. संतोष दोशी, डॉ. किरण फडे, डॉ. सचिन फडे, डॉ. बाहुबली दोशी, डॉ. दिलीप सिध्दपुरा, डॉ. सुषमा फडे, डॉ. सोनाली गांधी, डॉ. तृप्ती फडे, डॉ. स्नेहा फडे, डॉ. अजित गांधी उपस्थित होते.