मला एकदा का होईना,
तुला भेटायचं आहे
माझ्या मनातलं तुला,
सांगायच आहे..
मला एकदा होईना,
तुला पहायचं आहे..
तुझ्या डोळ्यात माझं,
 प्रेम पहायचं आहे.
एकदा का होईना,
तुझा स्पर्श जाणयायचं आहे,
नि तुझ्या कूशीत,
मला जगायचं आहे..
एकदा का होईना,
तुला भेटायचं आहे.
तुझ्या गंधात गंध
मिसळून भान हरवायचं आहे..
नि तुझ्या श्वासात श्वास मिसळून 
आपलसं करायचं आहे..
एकदा का होईना,
तुला भेटायचं आहे.
तुझ्या ओठाचा स्पर्श,
अनुभवायचं आहे..
                                                                        - स्‍वप्‍नील चटगे
 
Top