नवर्षाचा धांगडधिंगा
शहरात फक्‍त कर्कश आवाज
आणि बाटल्‍यांचा ढिग होता
किशोरांच्‍या हातीसुध्‍दा
मद्याचाच पेग होता,

आयुष्‍याचा आस्‍वाद घेत
मम्‍मी-पप्‍पाची पार्टी चालू
पाश्चिमात्‍यांची संस्‍कृतीच आहे
त्‍यांच्‍यापेक्षा कार्टी चालू

तरुण-तरुणी तर नको तिथे
अर्ध नग्‍न नाचत होते
आजी-आजोबाच्‍या कवळीला
हाडसुध्‍दा पचत होते

गावाकडेही अशीच काहीशी
मजा करणारी खोली आहे
चोरी चोरी चुपके चुपके
मित्रांची मेजवानी ओली आहे

जिकडे तिकडे नववर्षाचा
धांगडधिंगा माजला होता
सरकारचा पुढाकार पाहून
गांधीबाबाही लाजला होता

- भगवंत सुरवसे
 
Top