नळदुर्ग :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष रामदास आठवले यांची महायुतीच्‍या माध्‍यमातून राज्‍यसभेवर खासदार म्‍हणून निवड झाल्‍याबद्दल येथील रिपाई कार्यकर्त्‍यांनी फटाक्‍यांची अतिषबाजी करुन पेढे वाटून आनंदोत्‍सव साजरा केला.
       शिवसेना-भाजपा-रिपाई महायुतीच्‍या माध्‍यमातून राज्‍यसभेवर खासदार म्‍हणून रामदास आठवले यांच्‍या निवडीचा बिनविरोध उमेदवारी अर्ज दाखल होताच नळदुर्ग येथे रिपाईचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष दुर्वास बनसोडे, तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड, उपाध्‍यक्ष दत्‍ता बनसोडे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्‍यांनी नळदुर्ग बसस्‍थानकासमोर, भिमनगर, बौद्धनगर आदी ठिकाणी फटाक्‍याची आतिषबाजी करून पेढे वाटून जल्‍लोष केला. निरपेक्ष भावनेने रामदास आठवले यांना राज्‍यसभेवर पाठवून रिपब्लिकन पक्षाला सन्‍मानाने एन. डी.ए मध्‍ये समाविष्‍ट करून घेतल्‍याबद्दल महायुतीचे राष्‍ट्रीय नेतृत्‍व राजनाथ सिंह, नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे, उध्‍दव ठाकरे, प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आदींचे रिपाई कार्यकर्त्‍यांनी अभिनंदन केले.
   या प्रसंगी रिपाईचे महादेव कांबळे, विठ्ठल बाबू बनसोडे, यूवा अघाडीचे तालुकाध्‍यक्ष अरूण लोखंडे, तालुका संघटक विलास गायकवाड, अनिल लोंढे, मल्‍हारी लोंढे, गिरजाप्‍पा बनसोडे, शकील काझी, केशव गायकवाड सह  कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top