सेलेब्रिटिंगचा नववर्षाचा संकल्‍प

नरेंद्र मोदी :-
इतिहासाच्‍या पेपरमधील जोड्या लावा याविषयी अभ्‍यास करणार

 

राहुल गांधी :- बिनबाह्याचा (हाप) शर्ट घालणार (बाह्या सावरुन बोलण्‍याची गरज पडणार नाही)
 





मनमोहनसिंग :- पोपटाची उष्‍टी पेरु खाणार (बोलता येण्‍यासाठी)
 




 
अण्‍णा हजारे :- हिंदी शिकण्‍यासाठी तास लावणार
 






 



भारतीय क्रिकेट संघ :- उसळणा-या चेंडूचा सामना करण्‍यासाठी उसळ खाणार
 



  
 

शरद पवार :- कृषीविषयक सोडून इतर विषयावरच बोलणार
 





सोनिया गांधी -: यावर्षी तरी लिहून दिलेले भाषण वाचणार नाही
 




 


राज ठाकरे -: मराठीच्‍या मुद्यावर बोलताना टिपिकल इंग्रजी शब्‍द वापरणार नाही

 



 

उध्‍दव ठाकरे -: सैनिकांना 'चले जाव चा' आदेश देणार नाही
 






 


अरविंद केजरीवाल -: आई शप्‍पथ! उगाच आंदोलन करणार नाही
 




लालकृष्‍ण अडवणी :- मोदीच्‍या वाटेत आड वाणी घालणार नाही
 




अमिताभ बच्‍चन -: मनसेच्‍या व्‍यासपीठावर येणार नाही
 






पृथ्‍वीराज चव्‍हाण :- तुंबलेल्‍या फायलींसाठी गोडाऊन बांधणार
 




 
अजित पवार :- वाचाळ बोलणार नाही
 
Top