शिवशाही ते लोकशाही
राजे शिवशाही होती का मंदी?
झाडे तोडण्यावर होती का बंदी?
किल्ल्यावर आदर्श सोसायटी उभारण्याची
तानाजीलाही होती का संधी?
डुप्लीकेट जॅकेट (चिलखत)
घेतल्या असत्या का पंतानी
साळसकर, कामठे ठरले असते का?
संताजी, धनाजी आणि येसाजी
राजे दुष्काळात तुम्हीही
घेतल्या होत्या का मतासाठी सभा
स्विस बँकेत पैसे ठेवायला
संवगड्यांना दिली असती का मुभा?
राजे अफजल खानाला मारायला
पाठवायची ना कंमाडोची फौज
वाटलं होत का तुम्हाला
एसीत बसून करावी मौज
राजे दुष्काळातही तुम्ही उगाच
शेतक-यांना केला होता सारा माफ
आमचे राज्यकर्ते चुकूनही
करतील का हे असलं पाप
राजे दुष्काळ निवारणासाठी
तुम्हीही बांधली होती का धरणं
चाललं होतं का तेंव्हा
आष्ट प्रधानाचं तिजोरी भरणं
रायबाच्या लग्नात राजे
तानाजीनं दाखवला असता डामडौल
पाण्यासारखा पैसा खर्च करायला
दिला असता का तुम्ही कौल?
राजे सिंचनावरुन तुमच्यावरही
झाली होती का टिका?
श्वेतपत्रिका काढण्यसारखा
प्रसंग आला होता का बाका?
निवडणुकीच्या तोंडावर तुम्हीही
केली असती का आश्वासनाची खैरात?
केली असती टोल धाड तर
स्वराज्य पोहचल असतं का घराघरात?
विश्रामगृहात चमच्यानी केली असती
कल्याणच्या सुभेदाराची सुन देऊ
खरं सांगा राजे तुम्हाला
दिसल्या असत्या का मॉं जिजाऊ?
राजे माफ करावं
मांडला असा प्रमाद
शिवशाहीकडून पुन्हा
लोकशाहीला घालायची होती साद...
- भगवंत सुरवसे
राजे शिवशाही होती का मंदी?
झाडे तोडण्यावर होती का बंदी?
किल्ल्यावर आदर्श सोसायटी उभारण्याची
तानाजीलाही होती का संधी?
डुप्लीकेट जॅकेट (चिलखत)
घेतल्या असत्या का पंतानी
साळसकर, कामठे ठरले असते का?
संताजी, धनाजी आणि येसाजी
राजे दुष्काळात तुम्हीही
घेतल्या होत्या का मतासाठी सभा
स्विस बँकेत पैसे ठेवायला
संवगड्यांना दिली असती का मुभा?
राजे अफजल खानाला मारायला
पाठवायची ना कंमाडोची फौज
वाटलं होत का तुम्हाला
एसीत बसून करावी मौज
राजे दुष्काळातही तुम्ही उगाच
शेतक-यांना केला होता सारा माफ
आमचे राज्यकर्ते चुकूनही
करतील का हे असलं पाप
राजे दुष्काळ निवारणासाठी
तुम्हीही बांधली होती का धरणं
चाललं होतं का तेंव्हा
आष्ट प्रधानाचं तिजोरी भरणं
रायबाच्या लग्नात राजे
तानाजीनं दाखवला असता डामडौल
पाण्यासारखा पैसा खर्च करायला
दिला असता का तुम्ही कौल?
राजे सिंचनावरुन तुमच्यावरही
झाली होती का टिका?
श्वेतपत्रिका काढण्यसारखा
प्रसंग आला होता का बाका?
निवडणुकीच्या तोंडावर तुम्हीही
केली असती का आश्वासनाची खैरात?
केली असती टोल धाड तर
स्वराज्य पोहचल असतं का घराघरात?
विश्रामगृहात चमच्यानी केली असती
कल्याणच्या सुभेदाराची सुन देऊ
खरं सांगा राजे तुम्हाला
दिसल्या असत्या का मॉं जिजाऊ?
राजे माफ करावं
मांडला असा प्रमाद
शिवशाहीकडून पुन्हा
लोकशाहीला घालायची होती साद...
- भगवंत सुरवसे
