बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील प्रसन्नदाता गणेश मंडळ ट्रस्टच्या वतीने गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
या गणेश जयंती उत्सवात महिलांसाठी महिला जल्लोष, विविध गुणदर्शन, गणेश याग, सुश्राव्य भारुड, गणेश जयंती उत्सव, स्त्री भृण हत्याविरोधात "मला बहिण पाहिजे" या विषयावर वि.गंधर्व साळुंखे यांचे व्याख्यान, नववधू सदस्यांच्या हस्ते पालखी पूजन, परंपरागत वाद्यांच्या सुमधुर गजरात शहरातील प्रमुख मार्गावरुन भव्य मिरवणूक, ह.भ.प.ॲड्.जयवंत बोधले महाराज यांचे "अध्यात्म आणि आजचा युवक" या विषयावर प्रवचन आदी कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी प्रसन्नदाता ट्रस्टच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या मोक्षधाम (स्मशानभूमी) विकास या सामाजिक कामासाठी विविध दात्यांनी देणगी दिली. यात अक्षय बंडेवार यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये, मंगला देशपांडे यांनी एक्कावन्न हजार, आनंद गलगली यांनी दहा हजार, मुकूंद झगडे यांनी पाच हजार, धनंजय अडाणे यांनी पाच हजार रुपये देणगी दिली.
याप्रसंगी बोलतांना ॲड्. बोधले महाराज म्हणाले, इथे प्रसन्नता अन दातृत्वही आहे, मोक्षधामसारख्या सामाजिक कार्यात हे मंडळ अत्यंत चांगले काम करीत असून याची प्रेरणा इतरांनी घ्यावी आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष कमलेश मेहता, बसवेश्वर गाढवे, बंडू माने, हर्षल रसाळ, राहूल कुंकूलोळ, पद्माकर झालटे, प्रमोद भंडारी यांच्यासह मंडळाचे शेकडो कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास जगदाळे यांनी केले.