उस्मानाबाद -: मराठा समाजाला इतर मागासवर्ग या प्रवर्गामध्ये समाविष्ठ करण्यासाठी जिल्ह्यातील 73 गावांचे सर्वेक्षण दि. 9 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात  येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) शिल्पा करमरकर यांनी दिली आहे.
        परंडा-8, भूम-6, वाशी-7, कळंब-10, उस्मानाबाद -15, तुळजापूर-13, लोहारा-4, तर उमरगा-10 या 73 गावांचा लोकसंख्या जास्त असणारा तसेच कमी लोकसंख्योच्या एका प्रभागाची निवड या सर्वेक्षणामध्ये करण्यात आली आहे.   
           याकामी सर्व तहसीलदारांची तालुका सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सहायक प्रत्येक तालुक्यातून  2 अधिकारी कार्यरत असणार आहेत. ग्रामीण भागासाठी गटविकास अधिकारी तर शहरी भागासाठी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सहभाग असणार आहे. या सर्वेक्षणातील कामकाज अचूक होण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, कृषी अधिकारी यांचाही सहभाग याकामी असणार आहे. ज्या गावामध्ये 1200 लोकसंख्या आहे तेथे पूर्ण सर्वेक्षण तर 1200 पेक्षा जास्त लोकसंख्याच्या ठिकाणी दोन प्रभाग, तसेच नगरपालिका क्षेत्रातही प्रभागाचया यादीनुसार प्रातिनिधीक (शॅपल) स्वरुपात सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार आहे.
         सर्वेक्षणाची रुपरेषा प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आली आहे. तरी निवड झालेल्या गावातील नागरिकांनी सर्वेक्षणाच्या कामी जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.       
 
Top