उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध प्रवर्गात उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. भरतीची जाहिरात व सूचना www.mahast.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांने ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख    15 फेब्रुवारी, 2014 अशी आहे. 
     तसेच भरतीसाठी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र,उस्मानाबाद यांच्या  www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर देखील ऑनलाईन पध्दतीने नेांदविण्यात आलेली आहे. तरी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद, उस्मानाबाद येथे नोंदणी केलेल्या अर्हता प्राप्त उमेदवारांनीही जाहिरातीत नमुद केल्याप्रमाणे महामंडळाच्या www.mahast.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने विहीत मुदतीत अर्ज करावे, असे आवाहन विभाग नियंत्रक, राज्य मार्ग परिवहन महामंडळ, उस्मानाबाद यांनी केले आहे
 
Top