सोलापूर :- सन 2014-15 शैक्षणिक सत्रापासून पासून कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर नवीन अभ्यासक्रम / नवीन अधिकच्या तुकड्या सुरु करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. पुर्व व्यवसाय अभ्यासक्रम (9वी व 10 वी) +2 स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एच.एस.सी.व्होकेशनल), द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था/ वाढीव तुकड्या सुरु करु इच्छिणा-या पंजीकृत शासनमान्य शैक्षणिक संस्थाकडून दि. 15 फेब्रुवारी 2014 पासून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत तरी ज्या इच्छुक संस्थांकडे संबंधित अभ्यासक्रमासाठी आवश्यक सुविधा व साधानसामुग्री प्रत्यक्षात उपलब्ध आहे किंवा कसे यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद आहे अशा संस्थांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
    अर्ज तीन प्रतीत संबंधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचेकडे दिनांक 15 मार्च 2014 पर्यंत विलंब शुल्क भरुन सादर करावेत त्यानंतर दिनांक 31 मार्च 2014 पर्यंत विलंब शुल्क आकारुन अर्ज सादर करता येईल. अर्जाचा विहित नमुना व माहितीपुस्तिका व इता आवश्यक माहिती करीता संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
 
Top