टक्‍का टक्‍का वाढते मतदान
कोणाची उडणार धुळधाणं
कोणी झुलवी कोणी भुलवी
जिव अडकला (मत) पेटीत

ठोस नाही परी ठोसा आहे
कोणाचा कोणावर भरवसा आहे
पाजले किती, खळखळ वाजले किती
परी धड धडं ठोक्‍यात,
टक्‍का टक्‍का....

काही घडो इथे कोणी पडो
खंड न पडो आपल्‍या खर्चात
पुन्‍हा फिरकायचे नाही पाच वर्षात
टक्‍का टक्‍का....
आज हात जोडू

उद्या पाय ओढू
सारं जग आपल्‍या खिशात
टक्‍का टक्‍का...
 
थाट किती थयथयाट किती
निवडणुक आयोगाची इथे भिती किती
उर्मुट चाले आपल्‍या एैटीत
टक्‍का टक्‍का वाढते मतदान
कोणाची उडणार धुळधाणं
कोणी झुलवी कोणी भुलवी
जिव अडकला (मत) पेटीत
---------------- -------------------
- भगवंत सुरवसे
 
Top