उस्मानाबाद :- शैक्षणिक वर्ष 2014-15 साठी अध्यापक शिक्षण पदविका, डी.टी.एड. प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातून दि.2 ते 16 जून, 2014 या कालावधीत आवेदन पत्राची विक्री तर दि. 2 ते 17 जून, 2014 या कालावधीत आवेदन पत्राची स्वीकृती  होणार आहे. आवेदन पत्राची विक्री व स्विकृती त्या त्या जिल्हयाच्या प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी निश्चीत केलेल्या केंद्रावर तसेच प्रत्येक जिल्ह्यातील शासनमान्य अध्यापक विद्यालयात होणार आहे. विक्री व स्विकृती सकाळी 10 ते संध्या. 5 या वेळेत सुट्टीच्या दिवशीही सुरु राहील. आवेदनपत्राची  आणि नियमावलीची किंमत खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी रु.200 तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी रु.100 आहे. मागासवर्गीय उमेदवाराने आवेदनपत्र घेताना जात प्रमाणपत्राची  प्रत सादर करावी. उमेदवाराने प्रत्येक माध्यमासाठी स्वतंत्र आवेदनपत्र सादर करावे. शासनमान्य अध्यापक विद्यालयाची यादी www.mscert.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
    एकुण प्रवेश क्षमतेपैकी विभागस्तरावरुन 70 टक्के प्रवेश तर राज्यस्तरावरुन 30 टक्के प्रवेश मिळतील. प्रवेशास इच्छुक असणारे कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम.सी.व्ही.सी. शाखेतील पात्र उमेदवार इयत्ता 12 वी मध्ये खुल्या प्रवर्गासाठी किमान 49.5 टक्के गुणांसह उत्तीर्ण तर मागासावर्गीय् उमेदवार किमान 44.5 टक्के गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, असे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.                       
 
Top