बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी तालुक्यातील सहकारी तत्वावरील असलेल्या एकमेव भोगावती (संतनाथ) सह. साखर कारखाना विक्री करु नये याकरिता संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर दि.२७ मे २०१४ रोजी झालेल्या सुनावणीत शासन व एमएससी बँकेस नोटीस काढल्या व विक्री टेंडरला स्थगीती देण्यात आल्याची माहिती भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली.
    भोगावती सह.साखर कारखाना हा चांगल्या स्थितीत असतांना बंद पाडून संगणमताने विक्रीचे टेंडर काढण्यात आले, यामुळे साडेचारशे कामगार, ८ तालुक्यातील १६ हजार शेतकरी अडचणीत सापडले होते. सदरचा कारखाना वाचविण्यासाठी कोणत्याही राजकिय नेत्याने अथवा धनदांडग्यांनी प्रयत्न केले नाहीत. शेतकर्‍यांच्या भवितव्याचा विचार करुन राजकिय आकसापोटी बंद पाडलेला कारखाना आम्ही चांगल्या पध्दतीने चालवू शकतो असे म्हणत शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डुरे पाटील, डॉ.पंके, डॉ.जगताप, काका कोरके, गोविंदराव पंके यांच्या वतीने औरंगाबाद हायकोर्टात धाव रिट पिटीशन दाखल करुन विक्रीस स्टे घेण्यात आला होता. त्यांनतर एमएससी बँकेने नियमानुसार ६ वर्षांचे टेंड काढणे गरजेचे असतांना कागदोपत्री प्रोसेस करुन सन २०१३ साली फक्त एक वर्षांचे टेंडर काढले . यामध्ये कोणीही टेंडर भरु नये व कारखाना विक्री करु असे प्रयत्न करण्यात आले होती तरीही भाऊसाहेब आंधळकर यांनी टेंपलरोज कंपनीच्या माध्यमातून टेंडरची प्रक्रिया पूर्ण केली. परंतु त्यांना पंचनामा करुन कारखाना ताब्यात दिला नाही. २०१४ मध्ये टेक्निमली टेंडर उघडून ७ कोटी ९० लाख भरलेले असतांनाही तात्काळ ५ कोटी २७ लाखांची मागणी करण्यात आली. कंपनीने रक्कम भरण्याची तयारी दाखविली असतांनाही अमान्य करुन कारखाना विक्रीच्या स्टेला केराची टोपली दाखवून पुन्हा विक्री करण्याची प्रक्रिया केली. १ मे २०१४ पासून कारखाना विकत घेण्यासाठी अनेक व्यक्ती व कंपनीमार्फत पाहणी केली. सदरची बाब लक्षात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संभाजीनगर (औरंगाबाद) हायकोर्ट यंथे अवमान याचिका दाखल केली. यामध्ये डुरे पाटील, डॉ.पंके, डॉ.जगताप, काका कोरके, गोविंदराव पंके, भाऊसाहेब आंधळकर, विश्वासराव पाटील, नामदेवराव शिंदे यांनी ऍड.आनंद देवकते यंाचेमार्फत न्या.जाधव साहेब यांचे कोर्टात रिटपिटीशन दाखल केले. त्यावर शासनासह एमएससी बँकेसही नोटीस काढण्यात आली आहे. यामध्ये कारखाना विक्रीस स्थगिती दिल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
Top