उस्मानाबाद -: खरीप हंगाम 2014-15 साठी जिल्हयाला महिको कंपनीचे (बी.टी.कापूस) एम. आर. सी. -7351 (कणक) या वाणाचे 18 हजार 84 पाकिटे व अजित सिडस कंपनीचे अजीत-155 या वाणाचे 4 हजार 300 पाकिटे प्राप्त झाली असून कळंब, भूम, वाशी, परंडा, उस्मानाबाद  तालुक्यातील एकूण 115 कृषि सेवा केंद्रामार्फत या बियाण्याची विक्री किंमत 930 रुपये प्रति पाकीट करण्याबाबत संबंधितांना सूचना दण्यात आल्या आहेत. प्रत्येक शेतक-यास दोन किंवा तीन पाकीटे कृषी कर्मचाऱ्यांसमक्ष विक्री करण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
    तरी शेतक-यांनी सदरील बियाणे 930 रुपये  या दराने रितसर पक्की पावती घेऊन व पाकिटे सिलबंद असल्याची खात्री करुनच खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मदनलाल मिणीयार यांनी केले आहे.
 
Top