उस्मानाबाद :- येथील शासकीय निवासी शाळा, दर्गा रोड, उस्मानाबाद येथे  सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसुचित जातीच्या मुलींसाठी निवासी शाळा चालविली जाते. इयत्ता 5 वी ते 10 वर्गातील प्रत्येक वर्गात किमान 40 विद्यार्थीनींना प्रवेश दिला जातो.  सन 2014-15 या शैक्षणिक वर्षासाठी गुणवत्तेनुसार प्रवेश घेऊ इछिणा-या विद्यार्थीनींनी प्रवेश घेण्यासाठी शासकीय निवासी शाळेमध्ये रितसर अर्ज गुणपत्रकेसह सादर करण्याचे आवाहन गृहपाल, अनसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा यांनी केले आहे. प्रवेश घेतेवेळी मागील वर्षी उत्तीर्ण असल्याचा दाखला, उमेदवार हा अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग व अपंग प्रवर्गातील  असावा, पालकाचे वार्षी क उत्पन्न  अनुसूचित जातींसाठी 2 लाख तर इतर प्रवर्गासाठी 1 लाख असे असावे, नियमानुसार भोजन व राहण्याची सुविधा,शैक्षणिक साहित्य,पुस्तके व गणवेश उपलब्ध करुन दिले जातात.     प्रवेशासाठी अर्ज विनामुल्य दिले जातात. तरी विद्यार्थींनी आपले अर्ज 31 ऑक्टोबर,2014  भरावेत असेही आवाहन करण्यात आले आहे.
 
Top