वैराग (महेश पन्‍हाळे) -: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र गायकवाड यांना मिळालेल्या मताधिक्यामध्ये वैराग भागाचा मोलाचा वाटा आहे. शिवसेनेला सुमारे वीस हजार ७७१ मतांचे मताधिक्य मिळाले आहे . वैराग भागातील ५६ गावांपैकी ६ गावे वगळता शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांना मताधिक्य मिळाले आहे .
       उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात जिकडे बार्शी  तिकडे सरशी असे म्हटले जाते. पण याच मतदारसंघात वैराग जिकडे विजय तिकडे असी स्थिती असते. त्यामुळे विधानसभा असो व लोकसभा वैराग भागाला अधिक महत्व निर्माण झाले आहे. वैराग भागात राष्ट्वादीचे  चांगले बस्तान असताना शिवसेनेने बाजी मारल्याने मोदी लाट काय असते हे वैराग भागातील जनतेने जवळून पहिले आहे. वैराग भागातून एकूण ५३ हजार ८७५ इतके मतदान राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षासाठी झाले होते. यात शिवसेनेला ३७,१२३ मतदान झाले, तर राष्ट्रवादी पक्षाला १६,३५२ इतके मतदान झाले. यात शिवसेनेला वैराग भागातून २० हजार ७७१ इतके मताधिक्य मिळाले .
                वैराग भागातील वैराग २६६२, पानगाव १५५२, कोरफळे ९0९, सुर्डी ७८९, तडवळे ६५५, सासुरे ८५३, रातंजण ६९२, उपळे (दु) ८३१, शेळगाव ८६२ आदी मोठय़ा गावातून शिवसेनेला मताधिक्य मिळाले आहे. तर  हळदुगे ५५, पिंपरी ९८, बोरगाव 0३, गौडगाव १५, आंबेगाव १0 अशा पाच गावांतून राष्ट्रवादीला अत्यल्प पण मताधिक्य मिळाले आहे.
            यामुळे वैराग भागात राष्टवादीचे व कांग्रेस चे वर्चस्व असून देखील शिवसेनेला मताधिक्य मिळाले. त्यात कांग्रेसचे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी शिवसेनेला पाठिबा दिल्याने शिवसेनेला बळ मिळाले. त्यातच रवी सरना मोदी लाटेचा हि फायदा झाला. त्यात वैराग भागात शिवसेनेचे अस्तित्व नसताना त्यांना मिळालेल्या लीड मुळे शिवसेनीकात उत्साह वाढला आहे.
 
Top