उस्मानाबाद -: राज्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य युवापुरस्कार प्रतिवर्षी देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. राज्यस्तरावर युवा पुरस्कार क्रीडा विभागाचे क्षेत्रीय विभागानुसार प्रत्येक विभागातील एक युवक, एक युवती, एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतील. सदरच्या पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार प्रत्येकी पन्नास हजार व संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार रुपये एक लक्ष असे असेल. 
    सदरील राज्य पुरस्काराच्या अटी व शर्ती पात्रता,अर्ज याबाबत सविस्तर माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनायाच्या संकेतस्थळ http://sports.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद यांचेशी संपर्क साधावा आणि पुरस्कारासाठीचे परिपूर्ण प्रस्ताव 30 जुलै, 2014 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.    
 
Top