उस्मानाबाद :- नागरी हक्क संरक्षण कायदा व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांबाबत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी दिले.
     येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, सहायक आयुक्त अनिल शेंदारकर, जिल्हा सरकारी वकील व्ही. बी. शिंदे यांच्यासह जिल्हास्तरीय समितीचे सदस्य उपस्थित होते. 
     पाटील यांनी यावेळी या कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या तक्रारींची माहिती घेतली.  सध्या यातील 20 प्रकरणे पोलीस तपासावर आहेत. त्या प्रकरणी संबंधित चौकशी अधिका-यांनी या प्रकरणांच्या तपासाबाबत गती वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले.  
 
Top