उस्मानाबाद- विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील चार विधानसभा निवडणुकीसाठी  चौथ्या  दिवशी  111 अर्जांची विक्री झाली. तर आज तुळजापूर, उमरगा विधानसभा मतदारसंघात  प्रत्येकी एक तर उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
           उमरगा मतदारसंघात 7 जणांनी 13 अर्ज, तुळजापूर मतदारसंघात 15 जणांनी 37 अर्ज, उस्मानाबाद मतदारसंघात 21 जणांनी  50 अर्ज आणि परंडा मतदारसंघात 6 जणांनी 11 अर्ज घेतल्याचे संबंधित निवडणूक यंत्रणेने कळविले आहे. चौथ्या दिवशी उमरगा विधानसभा मतदार संघात हरीष माधवराव डावरे  यांनी एक नामनिर्देशनपत्र, तुळजापूर मतदारसंघात नवनाथ दशरथ उपळेकर यांनी एक नामनिर्देशनपत्र तर उस्मानाबाद मतदार संघात सुशिलकुमार विनायक पाडुळे यांनी एक व ॲड. जयराम बळीराम घुले यांनी दोन नामनिर्देशनपत्र दाखल केले.
 
Top