नळदुर्ग  - ट्रॅक्टरघेण्यासाठी माहेरवरून एक लाख रुपये घेऊन ये, म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
       तुळजापूर तालुक्यातील दहिटना येथील पद्मीन यांचा विवाह दोन वर्षापूर्वी जळकोट येथील विश्वनाथ कांबळे यांच्याशी झाला. परंतु, विवाहाच्या काही महिन्यानंतर सासरच्या मंडळींनी तू आम्हाला पसंद नाहीस, ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरवरून एक लाख रुपये घेऊन ये, म्हणून गेल्या वर्षभरापासून छळ केला. या छळाला कंटाळून पद्मीन कांबळे यांनी याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविराेधात तक्रार केली. त्यानुसार पती विश्वनाथ कांबळे याच्यासह सासरा कंुडलीक कांबळे, सासू सखुबाई कांबळे, दीर संतोष कांबळे, नणंद सरस्वती कांबळे (सर्व रा. जळकोट) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
Top