बार्शी - राज्यातील एकमेव असा तीन जिल्हे व आठ तालुक्याचे कार्यक्षेत्र असणार्‍या व सत्ताधार्‍यांनी बंद पाडलेल्या वैराग येथील संतनाथ सहकारी साखर कारखान्याचा भोंगा सुरु केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असे आश्‍वासन देत या परिसरात औद्यागिक वसाहतही उभी करण्याचे वचन विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सर्जापूर, जवळगांव येथील सभेत दिले.
    सर्जापूर येथील सभेच्या व्यासपीठावर वैरागचे सरपंच संतोष दादा निंबाळकर, काकासाहेब कोरके, दादा डोईङ्गोडे, अशोक सावळे, आनंद कोरके, बाबासाहेब कापसे, दिगंबर कानगुडे, आयुब बागवान, रिपाइंचे शहराध्यक्ष शंकर वाघमारे, राहूल बोकेङ्गोडे, भाजपचे प्रमोद वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
    सर्जापूर येथील प्रचारसभेस प्रारंभ करण्यापूर्वी राऊत यांच्याहस्ते तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भाषणात राऊत म्हणाले, आम्ही आमदार नसतानाही भोगावती कारखान्याच्या परिसरात एमआयडीसी उभारण्याचा प्रयत्न केला. जेणेकरुन येथील सुमारे तीन हजार बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल परंतु सत्ताधार्‍यांना ते पटले नाही. भोगावतीचा परिसर २८३ एकरचा आहे. त्यापैकी ८३ एकर मध्येच कारखान्याचे कामकाज सुरु होऊ शकते. उर्वरीत २०० एकर मध्ये औद्योगिक वसाहतीचे प्लॉट पाडून शेतकरी उद्योजकांना त्याचे वाटप करायचे की ज्यामुळे रोजगार उपलब्ध होऊन वैरागचा परिसर सुजलाम सुङ्गलाम होऊ शकतो. कारखानाही कांही दिवस खासगी तत्वावर सुरु करुन आधुनिक यंत्रसामुग्री बसवली तर ऊस उत्पादकांना इतरत्र ङ्गिरण्याची आवश्यकता नाही. या पध्दतीचे कामकाज आम्ही सुरुही केले होते. परंतू सत्ताधार्‍यांनी ते हाणून पाडले, अशी टीका राऊत यांनी दिलीप सोपल यांचेवर केली.
    तालुक्यातील जनतेने सलग १३ वर्षे पंचायत समितीची सत्ता दिली. त्या माध्यमातूनही आम्ही १६ हजारांपेक्षा जास्त घरकुल गोरगरिबांना मिळवून दिली. गावातील रस्ते, नळपाणीपुरवठा योजनेची कामे मार्गी लावली असेही राजेंद्र राऊत यांनी ठणकावून सांगितले. नदी नाले ओढ्याची लांबी,रुंदी वाढवून शेतीसाठी पाणी वापरले तर येथील सर्वच शिवार हिरवा होईल, सर्व विकासकामासाठीच शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन राऊत यांनी ग्रामस्थांना केले.सर्जापूर येथील ज्येष्ठ नेते काकासाहेब कोरके यांनीही सर्जापूरच नव्हे तर वैराग मधूनही राऊत यांना मोठे मताधिक्य देऊ, असे आश्‍वासन दिले. माजी नगरसेवक अशोक सावळे यांनीही भाषणात सत्ताधार्‍यांवर टीका केली.
    जवळगांव येथील सभेच्या व्यासपीठावर माजी जि.प.सदस्य अनिल डिसले, सुभाष डुरे-पाटील, डॉ.भारत पंके, विलास गाटे, नेताजी डिसले, विष्णू ढेंगळे, काका ढेंगळे, नानासाहेब धायगुडे, शंकर खुने, भाऊ तांबे, कुंडलिक वाघमोडे, श्रीनिवास पाटील, कुंडलिक वाघमोडे, शहाजी निंबाळकर, रमेश माळी, शिवाजी सुळे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नानासाहेब घोरपडे, नवनाथ कापसे, निवृत्ती कापसे, विठ्ठल अडसूळ, धनाजी गलांडे, विष्णू डिसले, अहमद शेख, विकास मगर, किशोर सोनवणे, राहूल देशमुख, आप्पा खेंदाड, चंद्रकांत पौळ, श्रीशैल भालशंकर, दीपक लोंढे आदींनी परिश्रम घेतले.


 
Top