तुळजापूर- पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या उमेदवारीने तुळजापूरची लढत लक्षवेधी झाली आहे. तर माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांनी शेवटच्या क्षणी मनसेच्या रेल्वे इंजिनवर स्वार होण्याचा निर्णय घेतल्याने चुरस वाढली आहे. तसेच आघाडीच्या बिघाडीने सेना-भाजप पदाधिकाऱ्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी १८ अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३६ उमेदवारांनी ६९ अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (दि. ऑक्टोबर) लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जीवनराव गोरे यांच्या उमेदवारीने तुळजापूरच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांनी मनसेकडून उमेदवारी दाखल केल्याने चुरस वाढली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील आणि भाजपचे उमेदवार संजय निंबाळकर यांचेही आव्हान या उमेदवारांसमोर असणार आहे. मोदी लाट चालते का यावर निंबाळकर यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
{एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे हे आपल्या जिल्हा परिषद, एसटी महामंडळाच्या कामकाजाच्या अनुभवासह अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा, असे आवाहन करत आहेत. तसेच माजी कृषीमंत्री शरद पवार यांचे कृषी धोरणाचे कौतुक करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशावर टीका करत आहेत.यापुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सलग तीनवेळा वेगवेगळ्या पक्षांच्या वतीने देवानंद रोचकरी यांनी निवडणूक लढवली. प्रत्येकवेळीत्‍यांना मते पडली मात्र, त्यांना विजयश्री खेचता आली नाही.
 
Top